Farming Insurance : राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले चित्र पाहयला मिळाले आहे. अशा शेतकऱ्यांना आर्थिक आधार तातडीने मिळावा यासाठी राज्य सरकार मंत्रालयातून थेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई पाठवणार आहेत. मागील आवठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम हि शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच पैसे पाठवण्यात येणार आहे. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे.
Ahmednagar Nuksan Bharpai 2023 | Farming Insurance
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अहमदनगर मध्ये कामाचा आढाव घेत असताना हि प्रतिक्रिया पत्रकार परिषद मध्ये दिली आहे. तसेच प्रथम जिल्ह्यातून तालुका ठिकाणी निधी पाठवण्यात येत, त्यांनतर पंचनामे नुसार शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा केली जात होती.
अहमदनगर मधील शेतकऱ्यांनसाठी २९१ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर केली होती. त्यापैकी आतापर्यंत १६१ कोटी रुपये १ लाख ३५ शेतकऱ्यांना मध्ये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली असून १ लाख शेतकऱ्यांना पुढील दोन दिवसात नुकसान भरपाई मिळेल. बँक खात्याशी आधार नंबर लिंक करणे अनिवार्य असून सर्व शेतकऱ्यांनी सूचनाचे पालन करावे. ज्यामुळे ऑनलाईन पध्दतीने शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाई जमा होईल.
शेतकरी असाल तर आताच आमच्या आपला बळीराजा या WhatsApp Group वर सामील व्हा