Soybean Rate : नमस्कार शेतकरी मित्रांनो, अनेक बाजार पेठेत शेतकऱ्यांकडील नवीन सोयाबीन ( Soybean Arrival ) आलेला आहे. राज्यात अनेक ठिकाणी सोयाबीनचे भाव वाढतील तसेच आवक सुध्दा वाढेल अशी चर्चा शेतकऱ्यांन मध्ये होत आहे. जाणकरांच्या मते यावर्षी सोयाबीनचे पीक ( Sobean Plant ) चांगले असल्यामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. पण अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाल्याने सोयाबीने पीकचे ( Sobean Plant ) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
भारतात अनेक बाजार समित्यामध्ये शेतकऱ्याकडील नवीन सोयाबीन विक्रीसाठी येत आहे. तसेच महाराष्ट्रात यावर्षी जून महिन्यात अनेक भागात पावसाची कमतरता असल्यामुळे सोयाबीनची सुध्दा मागे पुढे झालेली आहे. जांणकरांच्या मते सोयाबीन लागवड काही दिवसांनी मागे पुढे असल्यामुळे आवक साधारपणे १५ दिवसाच्या आत वाढलेली दिसून येईल. मागील वर्षी प्रमाणे यावर्षी १२० लाख पेक्षा जास्त क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली नोंद आहे.
यावर्षी पावसामुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले नाही. तसेच शेतकऱ्यांनी योग्यवेळी फवारणी केल्यामुळे कीड रोगांचा प्रदभार्व सोयाबीन वर झालेला नाही. त्यामुळे यावर्षी सोयाबीनची स्थिती चांगलीच राहील असे जाणकरांच मत आहे. महाराष्ट्र सोडून इतर राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पण महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात येलो मोझॅक रोगाने धुमाकूळ घातला आहे. तसेच मध्य प्रदेशातील अनेक भागात खोड कीड आणि येलो मोझॅक या रोगाचा प्रादभार्व सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात पाहयला मिळाला आहे. त्यामुळे जाणकरांचा अंदाज खोटा ठरेल असे शेतकऱ्यांच म्हण आहे.
मागील वर्षीचा सोयाबीन मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जात आहे. १३ ते १५ लाख टन मागील वर्षीचा सोयाबीन असल्याचा अंदाज सांगण्यात येत आहे. तसेच मागील वर्षीचा सोयाबीन मोठ्या प्रमाणात असल्यामुळे यावर्षीच्या नवीन सोयाबीन वर परिणाम होईल अस मत उद्योगाकडून सांगण्यात येत आहे. उद्योगाकडून सांगण्यात येत असल्यालेला अंदाज हा जाणकरांना मान्य नाही.
यावर्षी या हंगामात मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे उत्पादन वाढणार अश्या बातम्या पसरत असल्यामुळे सोयाबीनचे भाव सरासरी नुसार थेट ७ हजार वरुन थेट ५ हजार वर पोहचले आहेत. जर अश्याच बातम्या पसरत असतील पढील महिन्यात सुध्दा सोयाबीनच्या भावात मोठी चढ उतार पाहयला मिळतील. यावर्षी सोयाबीनचे उत्पादन किती होईल याचा अंदाज आताच सांगण कठीण असल्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी पूर्वक सोयाबीन विक्रीस काढावा. मागील वर्षी कोणत्या महिन्यात पावसामुळे सोयाबीनचे नुकसान झाले तसेच कुठे कीड रोगाचा प्रादभार्व वाढला आणि कोणत्या भागात पुरेसा झाला नाही. यावरुन शेतकऱ्यांना सोयाबीनच्या उत्पादनचा अंदाज काढता येईल.
अमेरिका, ब्राझील आणि अर्जेंटीनात सोयाबीनचे पीक घेतले जाते. यावर्षी ब्राझील देशात खताच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांना सोयाबीन पीक घेण्यास परवडत नसल्याने तेथील शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी कमी केली आहे. तसेच अमेरिका मधील काही राज्यात मुसळधार पाऊस झाल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भारतात दुष्काळ किंवा मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांचे नुकसान झाले तर शिल्लक साठा उपयोग करतो आणि शिल्लक ठेवणे अंत्यत गरजेचे आहे. त्यामुळे शिल्लक साठाला घाबरण्याची गरज नाही, याचा परिणाम नवीन सोयाबीनच्या भावावर ( Sobean Rate ) होणार नाही. असे सोयाबीन उद्योजक म्हणतात.