Crop Insurance : जून ते ऑगस्ट २०२२ दरम्यान ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले अशा शेतकऱ्यांना लवकरच राज्य सरकारकडून मदत येणार आहे. निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना राज्य सरकाडून ७५५ कोटी रुपयांची मदत मिळणार आहे. जे शेतकरी नुकसान भरपाईच्या निकषात बसले नाहीत त्या शेतकऱ्यांना दसरा सणांच्य निमित्ताने मोठी घोषण राज्य सरकारने केली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवण्यासाठी राज्य सरकारने काही नियम बनवले आहे.
निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जवळपास सहा लाखा पेक्षा जास्त आहे. सहा लाख शेतकऱ्यांना आता अतिवृष्टीचा लाभ मिळवा यासाठी गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंत्रालयाच्या बैठकीत हजर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, गिरीश महाजन ( ग्रामविकास मंत्री ) मंत्रायलयाच्या बैठकीत हजर
राज्य सरकारकडून नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी ( natural disaster relief ) जवळपास ४५०० कोटी रुपये खर्च केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मदत
निकषात न बसणाऱ्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय, प्रस्ताव औंरगाबाद, सोलापूर, अमरावती येथील जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यसरकारकडे सादर केले होत.
निकषा पेक्षा जास्त देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे. तसेच शेतकऱ्यांना याचा लवकरात लवकर लाभ मिळणार आहे.