Weather updates : नमस्कार शेतकरी मित्रानो, गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. शेतकरी मित्रांनो आज सकाळी पासून काही जिल्हात ढगाळ वातावरण पाहयला मिळाले आहे. वातावरणात परतीच्या पावसाला पोषक वातावरण तयार झाल्याने मुसळधार पाऊस होत आहे. असे हवामान खात्याने सांगितले आहे. आज रात्री काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे.
आज रात्री पाऊस असणार का ?
आज रात्री ( २९ सप्टेंबर २०२२ ) नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, औरंगाबाद, लातुर, तसेच बीड जळगाव या जिल्ह्यात आज रात्री भाग बदलत धो धो पाऊस होण्याची शक्यता आहे.
काल रात्री मुंबईसह अनेक भागात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस ( rain ) झाला आहे. तसेच कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात या भागामध्ये दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
या राज्यात जोरदार वारे
पुढील दोन दिवसात ( २९ सप्टेंबर २०२२ ) गुरुवारी मणिपूर, झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, मिझोराम, त्रिपुरा, तेलंगणा, आसाम, नागालँड या राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस ( rain ) होण्याची शक्यता हवामान विभागाने माहिती दिली आहे.