IMD : हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, तब्बल १९ जिल्ह्यात २४ तासात भंयकर पावसाची शक्यता आहे. मान्सूनचे आगमन हे दोन ते तीन दिवस उशीरा हजेरी लावणार असल्यामुळे मान्सून पूर्व पाऊस प्रगती करत आहे. महाराष्ट्रात लांबणीवर मान्सूनचा पाऊस असणार पण केरळ मध्ये पुढील २४ तासात ( अंदाजे ) मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. आज राज्यातील अनेक जिल्ह्यात कडक ऊन, जोरदार वारे आणि पावसाचा कहर पाहयला मिळणार आहे.
भारतीया हवामान विभागाच्या मते, कोकण, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र तसेच विदर्भात तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मान्सून पूर्व पावसाची हजेरी पाहयला मिळणार आहे. तसेच राज्यातील बहूतांश भागात आज उन्हाचा पार हा वाढणार आहे.
IMD : आजचा हवामान अंदाज
भारतीया हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, ७ जून रोज तब्बल १९ जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस तसेच वादळी वारे पाहयला मिळण्याची शक्यता आहे. गडचिरोली, गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, वर्धा, जालना, बुलढाणा, परभणी, लातूर, उस्मानाबाद, बीड, ठाणे, सांगली, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, या १९ जिल्ह्यात बहूतांश भागात जोरदार वाऱ्यासह मान्सून पूर्व पाऊस असणार तसेच उर्वरित भागात उन्हाचा पारा हा वाढणार आहे.
Cyclone : चक्रवादळाचे वादळाचे संकट
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्रात पुढील २४ तासात चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. कमी दाबाच्या क्षेत्रात चक्रीवादळ तयार झाल्यास मोसमी वाऱ्यांचा वेग तसेच मान्सूनची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या आपला बळीराजा WhatsApp Group वर तुम्ही सामील होऊ शकतात