Panjab Dakh : पंजाब डख यांच्या मते आज 9 जून रोजी राज्यात पश्चिम महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पंजाब डख हवामान अंदाज | Panjab Dakh
पंजाब डख यांच्या मते आज राज्यात मुंबई, सातारा, सांगली, सोलापूर, लातूर, या जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाची सुरुवात होणार आहे. तसेच विदर्भ आणि मराठवाड्यात जवळपास १० ते १३ जून दरम्यान मान्सूनचे आगमन होईल. तसेच १३ ते १४ जून या तारखेला मान्सूनला गती मिळेल. १४ जून ते २० जून पर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस होणार तसेच २२ जून पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून पसरेल.
यावर्षी मान्सून केरळ मधून येणार नाही कारण अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे चक्रीवादळ तयार झाले, त्यामुळे केरळ मध्ये मान्सूनचे आगमन होण्यास विलंब होत आहे. पंरतू यावर्षी महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन हे पूर्व दिशेकडून मान्सूनचे आगमन होणार म्हणजेच यावर्षी मान्सूनचे आगमन हे तेलंगणा राज्याकडून होणार आहे. पूर्व दिशेने मान्सून आल्यावर विदर्भ आणि मराठवाड्यात चांगल्याप्रकारे पाऊस होणार आहे.
नांदेड, बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, या जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस सर्वाधिक पाहयला मिळणार आहे.
पंजाब डख : हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group सामील होऊ शकतात.
Hi