Draupadi Murmu : नमस्कार, द्रौपदी मुर्मूं बदल जाणून घेण्यासाठी योग्य वेबसाइट वर आला आहात. द्रौपदी मुर्मूं यांचा जन्म अनुसूचित जमाती ( cast ) आदिवाशी भागात संथाल जमाती मध्ये झाला आहे. २० जून १९५८ वर्षी ओडिशा राज्यात मयूरभंज जिल्हात बैदापोसी गावात द्रौपदी मुर्मूं यांचा जन्म आहे.
Draupadi Murmu |
Draupadi Murmu यांच्या वडिलांचा नाव बिरंचि नारायण टुडू असे आहे. द्रौपदी मुर्मूं यांचा विवाह श्याम चरण द्रौपदी मुर्मूं सोबत झाला आहे. द्रौपदी मुर्मूं यांना एक मुलगी आणि दोन मुले आहेत.
द्रौपदी मुर्मूं बदल माहिती
द्रौपदी मुर्मूं यांनी सुरूवातीला ओडिशा सरकारी कामात लिपिकाचे काम करत होत्या, त्यानंतर त्यांनी पाट बंधारे खात्यात उर्जा विभागात कनिष्ठ सहाय्यक वरती काम करत होत्या तसेच पुढे चालून शिक्षिका म्हणून काम केले आहे. १९७९ साली भुवनेश्वर या ठिकाणी रमादेवी महिला विद्यापीठात कला शाखेत Draupadi Murmu यांनी पदवी घेतली आहे.
द्रौपदी मुर्मूं राजकारणातील कालावधी
१९९७ साली प्रथमच रायरंगपूर मध्ये नगर पंचायतीच्या नगर सेविकासाठी प्रथमच उभ्या राहिल्या होत्या. तसेच रायरंगपूर मध्ये त्या नगर सेविका म्हणून निवडून आल्या होत्या.
बिजू जनता दल आणि भारतीय जनता पक्ष या दोन पक्षाने ओडिशा मध्ये युती केली होती, त्यावेळेस द्रौपदी मुर्मूं यांच्या वर मोठी जबाबदारी दिली होती.
६ जून २००० ते ६ ऑगस्ट २००२ या कालावधीत द्रौपदी मुर्मूं यांच्यावर वाणिज्य आणि परिवहन राज्यमंत्रीची जबाबदारी होती.
भारतीय जनता पक्षाकडून द्रौपदी मुर्मूं ( २०००-२००४ ते २००४ ते २००९ ) मध्ये दोन वेळेस आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.
झारखंडच्या नवव्या राज्यपाल म्हणून १८ मे २०१५ ते १२ जुलै २०२१ पर्यंत त्यांनी कार्य केले आहे.
द्रौपदी मुर्मूं यांनी घडवला इतिहास
ओडिशा मध्ये आदिवाशी भागातील पहिल्यांदा( महिला ) द्रौपदी मुर्मूं आदिवाशी नेत्या झाल्या आहेत.
झारखंड मध्ये इतिहासात पहिल्यांदाच ( महिला ) द्रौपदी मुर्मूं राज्यपाल झाल्या आहेत.
ओडिशात २००७ मध्ये विधानसभेत सर्वोत्कृष्ट आमदार म्हणून द्रौपदी मुर्मूं यांना नीलकंठ पुरस्कार देण्यात आला आहे.
द्रौपदी मुर्मूं यांनी २५ जुलै २०२२ या तारखेला राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली आहे. भारताच्या १५ व्या राष्ट्रपती तसेच द्रौपदी मुर्मूं ह्या आता भारताच्या दुसऱ्या महिला राष्ट्रपती झाल्या आहेत.