Panjab Dakh : पंजाब डख यांचा हवामान अंदाज महाराष्ट्रात नव्हे इतर राज्यात सुध्दा खरा ठरतो. इतर राज्यातील शेतकरी त्यांना हवामान अंदाज बाबत विचारत असतात. पंजाब डख यांनी शेतकऱ्यांना ९ जून रोजी दिलासा देणारी बातमी दिली आहे.
Panjab Dakh | पंजाब डख हवामान अंदाज | Havaman Andaj Today
पंजाब डख यांच्या मते, राज्यात ८ जून पासून मान्सूनचे आगमन झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते अजूनहि महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले नाही. पंजाब डख असे हि म्हणतात की, जून महिन्यात होणाऱ्या पावसाला मान्सूनचा पाऊस म्हणतात, असे आधीच पंजाब डख यांनी व्हिडिओ द्वारे स्पष्ट सांगितले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते, बिपरजॉय चक्रीवादळ मुळे मान्सून वर परिणाम होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आणखीन काही दिवस मान्सूनची वाट पाहावी लागणार आहे.
या उलट पंजाब डख यांच्या मते, बिपरजॉय चक्रीवादळ हे उलट्या दिशेने फिरत असल्यामुळे काही वारे महाराष्ट्रात प्रवेश करणार, त्यामुळे महाराष्ट्रात भाग बदलत विखुरलेला पाऊस पडणार आहे. १२ जून ते १४ पर्यंत राज्यात भाग बदलत विखुरलेला पाऊस असणार त्यानंतर १८ आणि २६ जून तारखेला राज्यात पावसासाठी पोषक वातावरण ठरणार आहे.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.