IMD : महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक, गोवा या राज्यात ढगाळ वातावरणांची दाटी पाहयला मिळत आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळाच्या परिणाममुळे मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.
IMD | 24 तासात वरूण राजाचे आगमन
सर्वात आधी केरळ मध्ये मान्सूनने ८ जून रोजी प्रवेश केला आहे. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक या राज्यातील काही भागात मान्सून पोहचल्या नसल्याने अनेक शेतकरी वाट पाहत आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, गोवा तसेच केरळ मधील काही भागात पुढील २४ तासात मान्सूनचे आगमन होणार आहे.
बिपरजॉय चक्रीवादळ हे रौद्र रुप धारण केल्यामुळे गोवा, कर्नाटक, केरळ, कोकणातील किनारपट्टीच्या भागावर ढगांची दाटी निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, पुढील २४ तासात महाराष्ट्रासह गोवा, केरळ, कर्नाटक मध्ये भाग बदलत पाऊस होणार आहे.
तसेच चक्रीवादळामुळे मुंबई मध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते पुढील १२ तासात उत्तर ईशान्यकडे हळूहळूवार चक्रीवादळ सरकत आहे.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या आपला बळीराजा या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.