Maharashtra Weather report : 10 जुलै पर्यंत या जिल्ह्यात तसेच या राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Maharashtra Weather report: राज्यात आज पासून मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे. याच बरोबर आज रात्री पर्यंत मुंबईत मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे. शेतकरी मित्रानो पुढील काही तासात रात्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या तीन जिल्ह्यात मुसळधार पाऊस होणार आहे तसेच ठाणे आणि मुंबई या ठिकाणी जोरदार वारे तसेच धोक्याच पाऊस सांगण्यात आला आहे.

Maharashtra Weather report
Maharashtra Weather report

महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात काल रात्री मुसळधार पाऊस झाला आहे. काही ठिकाणी सकाळपासून रिमझिम पाऊस पडत आहे. औरंगाबाद, बीड आणि अहमदनगर मध्ये काही शेतकऱ्यांन वर दुबार पेरणीचे संकट येणार होते. पण आता मान्सून अधिक सक्रीय झाल्यामुळे पुढील चार दिवस म्हणजेच १० जुलै पर्यंत राज्यात भाग बदलत मुसळधार पाऊस होणार आहे. काल रात्री अहमदनगर मध्ये काही भागात पावसाची सुरुवात झाली आहे.


आजचा हवामान अंदाज

६, ७, ८, ९, १० , जुलै पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस होणार आहे. ५ जुलै आज रात्री औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगांली, लातूर, नांदेड, बीड, उस्मानाबाद या आठ जिल्ह्यात आज जोरदार वारे तसेच मुसळधार पाऊस असणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. 
६ जुलै : परभणी, जालना, पालघर, रायगड, ठाणे, मुंबई, पुणे, बीड, लातूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या ठिकाणी अतिवृष्टीचा पाऊस होण्याची शक्याता आहे.

पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस 

भारतामधील काही राज्यात अति मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान खात्याने सांगितले आहे. महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा या पाच राज्यात पुढील चार ते पाच दिवस भाग बदलत मुसळधार पाऊस होणार आहे. पुढील काही तासात पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली, चंदीगड, पंजाब या राज्यात जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Leave a Comment