Mansoon update : आज पासून महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच २९ जून पासून ते १ जुलै पर्यंत अनेक राज्यात मुसळधार पाऊस असणार आहे. सिक्कीम, मेघालय आणि पश्चिम बंगाल मध्ये पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा ( weather update ) इशारा दिला आहे.
maharashtra havaman andaj today |
गेल्या काही दिवसापासून केरळ आणि कर्नाटक या राज्यात सतत मुसळधार पाऊस होत आहे. महाराष्ट्र आणि दिल्ली मध्ये उर्वरित भागामध्ये आज रात्रीपासून पावसाची हजेरी असणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मतेनुसार, आज पासून पुढील तीन ते पाच दिवस महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा, केरळ, पश्चिम बंगाल, सिक्कीम, गोवा भाग बदलत अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
आजचा हवामान अंदाज ( weather forecast news )
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आज रात्रीपासून पुढील दोन दिवस ( 29 जूलैपर्यंत ) ओडिसा, बिहार, झारखंड या तीन राज्यात काही भागात दमदार पाऊस होणार आहे. भारतीय हवामान विभागाने ( IMD ) नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. भारतामधील अनेक राज्यात ३० जून पासून मान्सून सक्रीय होणार आहे.
Maharashtra havaman andaj today
यावर्षी उत्तर महाराष्ट्रावर आणि कोकणात वरून राजाची चांगलीच कृपादृष्टी आहे. या वर्षी कोकण भागात सर्वाधिक पावसाची हजेरी होती. तसेच उत्तर महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. या भागात दिलासादायक पाऊस झाल्याने शेतकऱ्यांन मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच काही भागात जमिनीची ओल चांगल्याप्रकारे झाली असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीच्या कामात वेग वाढवला आहे.
कोकणात पुढील पाच दिवस पावसाची शक्यात हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात भाग बदलत पावसाची ( maharashtra rain ) शक्यता आहे. उर्वरित भागात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो.
महाराष्ट्रातील या जिल्ह्यात पाऊस ( maharashtra weather update )
नाशिक, सातारा, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आज रात्री मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. तसेच विदर्भात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो.
शेतकरी मित्रानो सतत हवामान अंदाज खरा ठरत नाही, कारण वाऱ्यांची दिशा बदली तर हवामान अंदाज सुध्दा बदलत असतो. त्यासाठी रोज हवामान अंदाज पाहण्यासाठी आपला बळीराज युटूब चॅनेला भेट द्या.