Monsoon 2023 : पुढील 1 महिना दुष्काळ सारखी स्थिती होणार ?

Monsoon 2023 : पुढील 1 महिना दुष्काळ सारखी स्थिती होणार ?
Monsoon 2023 : पुढील 1 महिना दुष्काळ सारखी स्थिती होणार ?

 

Monsoon 2023 : स्कायमेट वेदर ( Skymet Weather ) पुढील 4 आठवडे राज्यात व भारतात पाऊस कसा पडणार याबाबत सविस्तर हवामान अंदाज जारी केला आहे.

स्कायमेट वेदर हवामान अंदाज | Monsoon 2023

Skymet Weather यांच्या हवामान अंदाजनुसार भारतात तूरळक ठिकाणी पुढील १ महिना पाऊस असणार आहे. यावर्षी मान्सून लवकर न लावल्याने शेतकऱ्यांन मध्ये निराशा होती परंतू शेतकऱ्यांची आणखीन चिंता वाढणार आहे. यांचे मुख्य कारण म्हणजे स्कायमेट वेदर या खाजगी संस्थाच्या मते, यावर्षी ६ जुलै पर्यंत भारतात कृष‍ि क्षेत्र हे कोरडे राहण्याची शक्यता आहे.

भारतात मध्य भाग तसेच पश्चिम भागात दुष्काळ सारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सुरुवातीपासून मान्सून पाऊस अपूरा असल्यामुळे अनेक ठिकाणी मान्सूनचे आगमन झालेच नाही. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे चक्रीवादळ तयार होऊन गुजरातकडे गेले परंतू त्यासोबत महाराष्ट्रातील बाष्पभवन सुध्दा ओढून नेले आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मान्सून लांबणीवरच राहण्याची शक्यता आहे.

१५ जून पर्यंत तूरळक ठिकाणी पाऊस

स्कायमेट वेदर ( Skymet Weather ) खाजगी संस्थानुसार महाराष्ट्र, छत्तीसगड, झारखंड, ओडिशा, बिहार या पाच राज्यात अजूनहि मान्सून स्थिर राहत नाही. तसेच बंगालच्या उपसागरात हालचाल हि उदयास न आल्यामुळे चिंता वाढत आहे. हवामान अंदाज नुसार राज्यात १ महिना हा तूरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो.

शेतकऱ्यांची चिंता वाढणार ?

मान्सूनच्या पावसावर शेतकऱ्यांच गणित असत, परंतू यावर्षी मान्सूनने आगमन झालेच नाही. तसेच स्कायमेट वेदर या खाजगी संस्थाच्या मते, आणखीन 1 महिना देशात तूरळक ठिकाणीच पावसाचे आगमन होणार असल्यामुळे शेतकऱ्यांची आणखीन चिंता वाढली आहे.

हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या आपला बळीराजा या WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Panjab Dakh : पंजाब डख यांचा 15 जून पर्यंत सविस्तर हवामान अंदाज
Panjab Dakh : पंजाब डख यांचा 15 जून पर्यंत सविस्तर हवामान अंदाज

Leave a Comment