Maharashtra : मागील दोन महिन्यापासून महाराष्ट्रासह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाच्या भावात चढ उतार पाहयला मिळत आहे. महाराष्ट्रात कापसाच्या भावात सुधारणा होण्याऐवजी शेतकऱ्यांना कापसाच्या भावात घसरण पाहयला मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विकावा कि रोखून ठेवावा असा प्रश्न पडला आहे.
Cotton Rate |
कापसाचे भाव वाढणार का ? | Cotton Rate
गेल्या दोन ते तीन महिन्यापासून शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवूण ठेवला आहे. जास्त काळ कापूस घरातच ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना त्वचा रोगाचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांन समोर अनेक अडचणी येत असल्यामुळे शेतकरी आता धैर्य सोडून कापूस विकण्यास तयार होत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ८६ सेंट प्रतिपाऊंड ते ९८.६० सेंट प्रतिपाऊंड दरम्यान कापसाच्या गाठीला भाव मिळाला आहे. चीन, ब्राझील, अमेरिका, ऑस्ट्रेलियामधून कापसाला मागणी होत आहे. कापसाचे व्यवहार हे मंद गतीने चालू असल्यामुळे कापसाच्या भावात तेजी दिसत नाही.
सध्या कापसाचे दर हे नरमले असले तरी देशात अनेक कापड गिरण्या कापसाची मागणी करत आहे. त्यामुळे कापसाचे भाव हे ८ हजार ५०० पर्यंत जाऊ शकतात. असा अंदाज कापूस अभ्यासकांनी सांगितला आहे.
फेब्रुवारी महिन्यात २ लाख कापसाच्या गाठी बाजारात पोहचल्या आहेत. महत्वाचे म्हणजे व्यापाऱ्यांचा अंदाज दीड लाख कापसाच्या गाठी बाजारात येथील असा होता. म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी फेब्रुवारी महिन्यातच कापसाची विक्री सर्वाधिक केली त्यानंतर गुजरात आणि तेलंगणानी केली आहे.
👇👇👇👀