Cotton : नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण २०२२ ते २०२३ मध्ये कापसाचे भाव कसे राहतील याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. ( cotton price status ) शेतकरी मित्रानो मागील काही वर्षापासून महाराष्ट्रात तसेच इतर राज्यात सुध्दा गारपीट तसेच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
cotton price status |
महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कापूस लागवड केली जात होती. पण गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात कापूस लागवडीचे प्रमाण कमी झालेले दिसत आहे.
याही वर्षी कापसाचे भाव वाढणार २०२२
शेतकरी मित्रानो मागील वर्षी उत्तर भारतात कापूस लागवड मोठ्या प्रमाणात झाली होती. बोंडआळीचा प्रादूर्भाव वाढल्याने तेथील उत्तर भारतातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
मागील वर्षी कापूस लागवड = राजस्थान ८ लाख हेक्टर, पंजाब ३ लाख हेक्टर,
मागील वर्षी भारतात कापसाला भाव चांगल्याप्रकारे मिळाला त्यामुळे शेतकरी आता मोठ्या प्रमाणात कापूस लागवड करणार असल्याचे चित्र पाहयला मिळत आहे. पण मोठ्या प्रमाणात कापूस लागवड झाल्यावर कापूस उत्पादन वाढल्याने २०२२ मध्ये कापसाचे भाव ( cotton price status ) स्थिर राहतील असे जांणकरांचे मत आहे.
जर कापूस लागवड मोठ्या प्रमाणात नाही झाली किंवा कापूस उत्पादन नाही वाढल्यास तर २०२२ मध्ये कापसाचे भाव घनघनीत वाढू शकतात.
कापूस लागवडीचे प्रमाण वाढणार
मागील वर्षी कापुस लागवडीचे प्रमाण कमी होते. पण यावर्षी मोठ्या प्रमाणात शेतकरी कापूस लागवड करण्याचा विचार करत आहे. याच मुख्य कारण म्हणजे यावर्षी कापसाला १३५०० पर्यंत भाव मिळाला आहे.
यामुळे शेतकऱ्यांचे आकर्षण कापसाकडे वळाले आहे. कापसाची लागवड मागील वर्षी कमी होतीच पण त्याच वर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली होती. यामुळे कापसाचे उत्पादन कमी झाले आहे.
भारतात कापसाची कमतरता निर्माण झाल्याने कापसाचे ( ‘cotton price status’ ) भाव वाढले आहे. उत्तर भारतात एप्रिल मध्ये कापूस लागवड करण्याची सुरूवात होते आणि मे महिन्यातच लागवड थांबते. तसेच यावर्षी कापूस लागवडीचे प्रमाण उत्तर भारतात जास्त असणार आहे. जाणकरांच्या मते उत्तर भारतात ८० टक्के कापूस लागवड पूर्ण झाली आहे.
कापूस लागवडीचे प्रमाण कमी का होत ?
महाराष्ट्रातील काही भागात कापूस लागवड केल्यानंतर योग्य वेळी पाउस न पडल्याने, पाण्याची टंचाई भासल्याने कापसाचे रोप जळून जातात. यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा कापसाची लागवड करावी लागते. ( cotton price status )
कापसाच्या पिकावर योग्य वेळी फवारणी नाही केल्यास बोंड आळीचा प्रादूर्भाव झाडावर पाहयला मिळतो.
शेतकऱ्यांना काही वेळेस वेचणी साठी मंजूर नाही मिळल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते. उदा : कापूस चोरीला जातो, योग्य वेळी वेचनी नाही झाल्यास कापूस झाडावरून खाली पडतो आणि खराब होतो.
काही वेळेस वातावरणात बदल झाल्याने गारपीट अवकाळी पाउस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले चित्र पाहायला मिळतात.
ज्या वेळेस कापूस वेचणी झाल्यानंतर शेतकरी आपला कापूस विक्रसाठी ( “cotton price status” ) काढतो त्यावेळेस त्यांच्या कापसाला योग्य भाव दिला जात नाही.
एका बाजूने खताचे भाव वाढतात तर दुसरीकडे कापसाला भाव नसतो.निसर्गाने शेतकऱ्यांना साथ दिली तर बोगस बियाणे शेतकऱ्यांना देउन शेतकऱ्यांना फसवल जात आहे.
असे अनेक इत्यादी कारणे आहेत ज्यामुळे शेतकरी कापूस लागवड करत नाही.