soyabean milk and cow milk : नमस्कार मित्रांनो, आज आपण सोयाबीन पासून दुध व दही कसे बनवले जाते हे पाहणार आहोत. गायीच्या दुधा पासून दही तसेच सोयाबीनच्या दुधा पासून दही बनवण्यासाठी किती कालावधी लागतो हे सुद्धा पहाणार आहोत.
soyabean milk and cow milk |
सर्वात प्रथम सोयाबीन ( soyabean milk ) पासून 1 लीटर दुध बनवण्यासाठी 50 ग्रॅम तुम्हाला सोयाबीन लागणार आहे. 50 ग्रॅम सोयाबीन तुम्हाला 5 ते 6 तास पाण्यात ठेवावे लागणार आहे. हे सोयाबीन चांगले भिजवून झाल्यावर, पाण्यातच तुम्हाला सोयाबीनला चाळून सालटे काढून टाकावे. ऐवढे पूर्ण झाल्यानंतर सोयाबीन मधील सर्व पाणी काढून टाकावे. त्यानंतर थोडे पाणी आणि भिजलेले सोयाबीन मिक्सर मधून काढावे.
त्यानंतर एक पातील घेऊन त्याचे तोंड रुमालाने झाकून त्यावरती मिक्सर मधून काढलेले सोयाबीन टाकून किंवा पिळून घेवावे लागणार आहे. असे तुम्हाला भिजलेल्या सोयाबीन सोबत तीन ते चार वेळेस करायचे आहे. जेणेकरून 1 लीटर 50 ग्रॅम सोयाबीन पासून दुध भेटेन. यानंतर तुम्हाला सोया दुध ( सोयाबीनचे दुध ) कोमट तापवून घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडीशी इलायची सुध्दा टाकू शकता. अशा प्रकारे सोया दुध तयार केले जाते.
सोया दुधा पासून दही
सोया दुधापासून दही बनवणे अंत्यत सोपे आहे. सोया दुधापासून बनवायचे असेल तर एक चमचा भर दही पाहिजे. हिवाळ्यात जर सोया दुधापासून दही बनवत असाल तर तुम्हाला एक कप दही लागणार आहे. सर्वात प्रथम तुम्हाला सोया दुधात दही टाकायचे आहे व त्यास चमच्याने 2 ते 3 मिनट हलवून घ्या. त्यानंतर 6 ते 5 तास झाकून ठेवावे. याप्रमाणे तुम्हाला सोया दुधापासून दही मिळून जाईल.
गायीच्या दुधा पासून दही
गायीच्या दुधा ( cow milk ) पासून दही बनवले जाते. या साठी 1 लीटर दुध घ्यावे त्यानंतर तुम्हाला त्या दुधास 15 मिनिटे तापवून घ्यायचे आहे दुध तापवून घेत असताना सतत दुधाला हलवून घेत जा कारण या मधील पाणी कमी होते तसेच घट दही निर्माण होते. गायीचे दुध तापल्यावर त्यास कोमट होऊ द्यावे. त्यानंतर चमचा भर तुम्हाला दही लागणार आहे. दुधा मध्ये दही टाकल्यावर त्यास 3 तीन मिनिटे हलवून घ्यायचे आहे. त्यानंतर त्या दुधास 7 तास झाकून ठेवावे. उन्हाळ्यात तुम्हाला 7 तास झाकून ठेवावे लागते तसेच हिवाळ्यात तुम्हाला 8 तास झाकून ठेवावे. यानंतर तुम्हाला गायीचे दुध झालेले दिसेल.
सोया दुधापासून दही ते गायीच्या दुधा पासून दही लागणार कालावधी
सोया दुधापासून दही लागणारा कालावधी
सोया दुधापासून दही बनवण्यासाठी हिवाळ्यात 7 तास लागतील. जर तुम्ही उन्हाळ्यात सोया दुधापासून दही बनवत असाल तर 8 तास लागणार आहे. ( Compare soyabean milk and cow milk )
गायीच्या दुधा पासून दही लागणार कालावधी
गायीच्या दुधा पासून दही बनवत असाल तर हिवाळ्यात तुम्हाला 7 तास कालावधी लागतो तसेच उन्हाळ्यात तुम्हाला 8 तासांचा कालावधी लागणार आहे.