Cotton : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज कापसाचे भावात प्रचंड भाव वाढले आहेत. डिसेंबर महिन्यात 9000 हजार पेक्षा जास्त भाव होता. तसेच जानेवारी महिन्यात 10 हजार पर्यंत कापसाचे भाव गेले होते. फेब्रुवारी महिन्यात कापसाचे भाव स्थिर राहिले होते. पण मार्च महिन्यात कापसाच्या भावात प्रचंड वाढ झालेली पहायला मिळत आहे.
kapsache bhav 2022 |
कापसाचे भाव 12 हजार पेक्षा जास्त ( Cotton )
शेतकरी मित्रांनो गेल्या आठवड्यात कापसाच्या भावात प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 25 मार्च 2022 तारखेला सिंदी सेलू बाजार समिती मध्ये आवक 1702 आली होती. या ठिकाणी कमीत कमी 8600 ते जास्तीत जास्त 12200 कापसाला भाव मिळाला होता. तसेच 26 मार्च 2022 आज हिंगणघाट बाजार समिती मध्ये 3000 हजार आवक आली आहे. या ठिकाणी कमीत कमी 8500 ते जास्तीत जास्त 12011 अशा कापसाला भाव मिळाला होता.
आजचे कापसाचे भाव 2022
अमरावती बाजार समिती मध्ये 2105 आवक आली आहे.
अमरावती बाजार समिती – कमीत कमी 9800 ते जास्तीत जास्त 11300 पर्यंत कापसाला मिळाला आहे.
आर्वी बाजार समिती मध्ये आवक 850 आवक आली आहे.
आर्वी बाजार समिती – कमीत कमी 8200 ते जास्तीत जास्त 11700 पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे.
जामनेर बाजार समिती मध्ये आवक 40 आली आहे.
जामनेर बाजार समिती – कमीत कमी 8037 ते जास्तीत जास्त 10105 पर्यंत कापसाला भाव मिळाला आहे.
हिंगणघाट बाजार समिती मध्ये आवक 3000 आली आहे.
हिंगणघाट – कमीत कमी 8500 ते जास्तीत जास्त 12011 पर्यंत कापसाला भाव मिळाला.
शेतकरी मित्रांनो वरील बाजार भाव बाजार समित्यांनी अपलोड केला आहे. बाजार भाव हा कमी जास्त होत असतो त्यामुळे चौकशी करुनच बाजार समिती मध्ये जावे.