Cotton : शेतकरी मित्रांनो आज कापसाच्या भावात मोठ्या प्रमाणात तेजी आली आहे. महाराष्ट्र मध्ये मराठवाड्यात आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात कापूस उत्पादक शेतकरी आहेत. यावर्षी भारतात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी ढगफुटी झाली आहे. यामुळे कापूस उत्पादकांना चांगलाच फटका बसला होता. ( Cotton rate in update ) आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची कमतरता निर्माण झाल्यामुळे भारतातील कापसाची मागणी चांगलीच वाढणार आहे.
Cotton rate in update |
शेतकऱ्यांनी विकला कापूस
शेतकऱ्यांच पांढर सोन म्हणून ओळखल जाणार कापूस आहे. महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. गुजरात, मध्यप्रदेश, बिहार या राज्यात सुध्दा कापसाचे पिक घेतले जाते. भारतात या वर्षी अतिवृष्टी झाल्याने कापसाची कमतरता निर्माण झाली. त्यामुळे कापसाच्या भावात ‘Cotton rate in update’ आपणास तेजी दिसत आहे. सुरुवातीला कापसाला भाव 6000 ते 5000 भाव मिळाला. अखेर डिसेंबरच्या शेवटी कापसाच्या भावात तेजी येणास सुरुवात झाली. डिसेंबर महिन्यात 8000 ते 9500 पर्यंत भाव मिळाला होता. जानेवारी 2022 मध्ये कापसाला 10 हजारांहून अधिक मिळाला आहे. काही शेतकऱ्यांनी टप्याटप्याने कापसाची विक्री केली होती. तसेच काही शेतकऱ्यांनी घरात कापसाची साठवणूक करण्यासाठी जागा नसल्याने कापसाची विक्री केली होती. काहीना हा योग्य भाव वाटला म्हणून कापूस विकून टाकला होता. जवळपास महाराष्ट्रात 80℅ टक्के गरीब शेतकरी आहेत या शेतकऱ्यांकडे शेती करण्यासाठी कमी शेत जमीन आहे. तसेच 20℅ शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात शेती करण्यासाठी शेत जमीन आहे.
व्यापाऱ्यांनी घेतला फायदा
महाराष्ट्रात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे. संपूर्ण भारतात अतिवृष्टी झाल्याने कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारत देश हा मोठ्या प्रमाणात कापूस पुरवठा करत आहे. भारतात ( Cotton rate in update ) कापसाची कमतरता असल्याने कापसाचे भाव वाढले आहे. विशेष म्हणजे गुजरात, बिहार, मध्यप्रदेश राज्यातील व्यापारी महाराष्ट्रात येउन कापूस खरेदी करत होते. काही वेळेस त्यांना रिकाम्या हाताने वापस जावे लागत होते. जवळपास मागील महिन्यात 80℅ शेतकऱ्यांनी आपला कापूस विकून टाकला आहे. ज्या शेतकऱ्यांनी कापसाची साठवणूक केली त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता कापसाचे भाव पुन्हा वाढण्याची सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसांपूर्वी अकोला बाजार समिती 11 पेक्षा जास्त भाव मिळाला होता. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून 9000 ते 10000 हजार प्रमाणे कापूस खरेदी केला होता. आता त्या व्यापाऱ्यांना 11 हजार पेक्षा जास्त भाव मिळत आहे.
आजचे कापसाचे भाव
मनवत बाजार समिती मध्ये 2500 आवक आली आहे.
मनवत – 8500 ते 11700 दरम्यान कापसाला भाव मिळाला आहे.
सिंदी सेलू बाजार समिती मध्ये 1523 आवक आली आहे.
सिंदी सेलू – 8600 ते 11800 दरम्यान कापसाला भाव मिळाला आहे.
परभणी बाजार समिती मध्ये 240 आवक आली आहे.
परभणी – 8400 ते 11300 दरम्यान कापसाला भाव मिळाला आहे.
वरील बाजार भाव 24-मार्च-2022 बाजार समिती मधील आहे. “Cotton rate in update” बाजार भाव कमी जास्त होत असतो त्यामुळे तुम्ही चौकशी करुनच बाजार समिती मध्ये जावे.