IMD : पुणे, दिल्ली, मुंबई या शहरात २४ जून रोजी दमदार पावसाने हजेरी लावली होती तसेच भारतीय हवामान विभागाच्या मते पुढील तीन दिवस अशाच प्रकारे पावसाची हजेरी राहणार आहे.
आज रात्री पाऊस असणार का ? | IMD | Monsoon 2023
भारतीय हवामान विभागाच्या मते, मध्य महाराष्ट्रात तसेच विदर्भात पोषक वातावरणात तयार असल्यामुळे २६ जून रोजी मुसळधार होणार आहे. तसेच प्रादेशिक हवामान विभागाच्या मते, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात मान्सूनचा पाऊस कमी वेळेत अधिक असणार आहे. रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यात तूफान पाऊस होणार असल्यामुळे हवामान विभागाने ऑरेंज अर्लट जारी केला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग या भागात सलग तीन पाऊस असणार आहे. पुणे, सातारा, नाशिक या तीन जिल्ह्यात भागात बदलत कमी वेळेत मान्सूनचा पाऊस अधिक असणार आहे. कोकण भागात तसेच मराठवाड्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडणार आहे.