Drought : महाराष्ट्रात मान्सूनने पहिल्या आठवड्यात हजेरी लावली पण हा मान्सून संपूर्ण राज्यात पोहचला नाही. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन, बिपरजॉय या नावाने चक्रीवादळ ( Cyclone ) तयार झाले. बिपरजॉय चक्रीवादळाने संपूर्ण महाराष्ट्रातील बाष्पभवन गुजरातकडे वाहून नेले. महाराष्ट्रातील मान्सूनचा वेग कमी झाला आणि यामुळे राज्यात दुष्काळ ( Drought ) सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मराठवाड्यात दुष्काळ ( Drought ) सारखी परिस्थिती
जून महिन्यात राज्यात सर्वात कमी पाऊस पडला आहे. २५ जून पासून चांगल्याप्रकारे पावसाची सुरुवात राज्यात झाली होती तसेच अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. मराठवाड्यात आणि विदर्भातील काही भागात पेरण्या योग्य पाऊस पाऊस पडला नाही. शेतकऱ्यांच्या पेरण्या खुळबल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
जून महिन्यात भारतात १९२३ वर्षी २०.५ मिलिमीटर, २०१४ वर्षी ३०.४० मिलीमीटर पाऊस कमी झाला आहे. यावर्षी तब्बल २२ वर्षानंतर ( १९०१ वर्षी ) नंतर ४१.३ मिलीमीटर पाऊस, देशात जून महिन्यात कमी झाला आहे. मिळालेल्या महितीनुसार देशातील महाराष्ट्र राज्यातील मराठवाड्यात, सर्वात कमी जून महिन्यात पाऊस पडला आहे. जुलै महिना लागला, तरीहि मराठवाड्यात योग्य पाऊस पडत नसल्याने, शेतकऱ्यांन मध्ये आणखीन चिंतेचे वातावरण निर्माण होत आहे.