Havaman Andaj Today 2023 : राज्यातील काही ठिकाणी पुढील सलग पाच दिवस मुसळधार राहिल असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात ९ जुलै पर्यंत पावसाचा जोर वाढणार असल्यामुळे हवामान विभागाने काही जिल्ह्यांना ऑरेंट अर्लट आणि येलो अर्लट दिला आहे.
Havaman Andaj Today
मागील दोन दिवसापासून पावसाची गती हि कमी झाली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात राज्यातील काहि भागात चांगल्या प्रकारे पाऊस झाला आहे. परंतू जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यात धो धो पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्रात आणि कोकण भागात पुढील ३ ते ४ दिवसात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस होईल आणि उर्वरित भागात सामान्य पाऊस होणार आहे. रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर या तीन जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस होणार असल्यामुळे हवामान विभागाने ऑरेंज अर्लट दिला आहे.
हिंगोली, नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, धुळे, नाशिक, नंदूरबार, सातारा, अहिल्यानगर ( अहमदनगर ), ठाणे, पुणे, मुंबई, रायगड या १३ जिल्ह्यात पुढील २४ तासासाठी येलो अर्लट जारी केला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यात एल निनोचा प्रभाव असल्यामुळे त्या ठिकाणी पाऊस कमी पडत आहे. आज रात्री पासून पुढील दोन दिवस विदर्भात वीजासह मुसळधार पाऊस पडत आहे.
मराठवाड्यात आजपासून पुढील दोन दिवस तूरळक ठिकाणी पाऊस होईल तसेच उर्वरित काही भागात सामन्य ते रिमझिम पाऊस होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पूर्व व पश्चिम भागात तसेच घाट माथ्यावर मुंबई वेधशाळेनुसार ५ जुलै पर्यंत पावसाचा जोर अधिक वाढणार आहे.