Weather Alert : जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात, या आठवड्यात अति मुसळधार पाऊस अनेक जिल्ह्यात पडणार आहे. हवामान खात्याने पुढील ४ दिवसाचा हवामान अंदाज जारी केला आहे.
राज्यात सर्वत्र चांगल्या प्रकारे पाऊस पडत आहे. हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, आज राज्यातील महत्वाच्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. त्यामुळे अनेक जिल्ह्यात येलो अर्लट तसेच ऑरेंज अर्लट सुध्दा देण्यात आले आहे. हवामान अभ्यासक यांच्या मते, जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात तसेच दुसऱ्या आठवड्यात राज्यात चांगल्या प्रकारे पावसाची हजेरी राहणार आहे.
आज 5 जिल्ह्यात गंभीर इशारा | Weather Alert
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा या पाच जिल्ह्या अतिवृष्टी सारख पाऊस पडेल असा गंभीर इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच पुणे आणि ठाण्यात सुध्दा आज पावसाचा अंदाज असल्यामुळे हवामान खात्याने या दोन जिल्ह्यांना येलो अर्लट दिला आहे.
खरतर पाहता, जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात मुंबई आणि पुणे भागात जोरदार पावसाची सुरुवात झाली आणि २ जुलै पर्यंत जोरदार पावसाची हजेरी पाहयला मिळाली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि पुणे भागात आज पावसाचा जोर कमी होईल व ६ जुलै पासून मराठवाड्यात आणि विदर्भात चांगल्या प्रकारे पावसाची सुरुवात होईल तसेच उर्वरित भागात सुध्दा भाग बदलत पाऊस पडणार आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात कोकण भागात आणि मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टी सारखा पाऊस आज पासून पुढील तीन दिवस पडणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात, विदर्भात, मराठवाड्यात आज या भागात महत्वाच्या ठिकाणी मुसळधार पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान अंदाज पाहण्यासाठी आताच आमच्या WhatsApp Group आपला बळीराजा ग्रुप वर सामील होऊ शकतात.