Maharashtra Rain : नवी मुंबई, ठाणे तसेच कोकण परिसरात आज तूफान पाऊस होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात नव्हे तर संपूर्ण देशात मान्सूनने चांगल्या प्रकारे हजेरी लावली आहे. महाराष्ट्रात सुध्दा चांगल्या प्रकारे पाऊस पडत आहे पण अनेक भागात पावसाने दंडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. आतापर्यंत कोकण भागात आणि पश्चिम महाराष्ट्रात चांगल्याप्रकारे पावसाने हजेरी लावली आहे. तसेच आजही महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.
आज पाऊस पडणार का ?
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकण भागात मुसळधा पाऊस पडणार असल्यामुळे ऑरेंज अर्लट देण्यात आला आहे. तसेच रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अर्लट जारी केला आहे. पालघर तसेच पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यांना सुध्दा हवामान विभागाने आज आरेंज अर्लट जारी केला आहे. ठाणे, सातारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने येलो अर्लट जारी केला आहे.