IMD : भारतीय हवामान विभागाच्या ( India Meteorological Department ) मते, महाराष्ट्रात जुलै महिन्यातील सुरुवातीच्या पहिल्या आठवड्यात अनेक ठिकाणी समाधान कारक पाऊस झाला आहे.
आयएमडीने दिलेल्या महितीनुसार राज्यात १ जुलै पासून ७ जुलै पर्यंत ३५ टक्के पर्यंत पावसाची नोंद झाली आहे. तसेच पुढील काही दिवसात राज्यातील कोकण भागात पावसाचा जोर हा ओसरणार आहे.
१ जुलै ते ७ जुलै दरम्यान मुंबई उपनगर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, बीड, नांदेड, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, धुळे, जळगाव, यवतमाळ या जिल्ह्यात तीव्र पावसाची नोंद भारतीय हवामान विभागाने केली आहे. पुणे, नंदुरबार, वर्धा या तीन जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस झाला आहे. तसेच उर्वरित सांगली, सातारा, मुंबई शहर, हिंगोली, अमरावती, अकोला, गडचिरोली, नागपूर, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया या जिल्ह्यात सुध्दा मोठ्या प्रमाणात पावसाची तूट असल्याची माहिती आयएमडीने दिली आहे.
१ जुलै पासून ७ जुलै दरम्यान विदर्भ वगळता उर्वरित भागात समाधानकारक पाऊस झाला आहे. जाणंकारच्या मते, राज्यातील काही भागात अधिक पाऊस तर काही भागात पावसाचे प्रमाण खुपच कमी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या अजूनहि खुळबंल्या आहेत. पुढील पाच दिवसात कोकण भागात पावसाचे प्रमाण कमी होणार तसेच रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे या भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल तसेच विदर्भात पुढील काही दिवस पावसाचे प्रमाण अधिक पाहयला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, राज्यात १५ जुलै पर्यंत विदर्भ वगळता उर्वरित भागात पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे.