Panjab Dakh Havaman Andaz Today : पंजाब डख यांनी १० जुलै रोजी नवीन हवामान अंदाज शेतकऱ्यांनसाठी जारी केला आहे. पंजाब डख यांच्या मते, १२ जुलै पर्यंत राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्रात, मराठवाड्यात आणि विदर्भात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे १२ जुलै पासून ते १५ जुलै पर्यंत राज्यात चांगला पाऊस पडणार आहे. तसेच पंजाब डख यांच्या मते, राज्यातील ज्या भागात पावसाचे आगमन झाले नाही, अशा ठिकाणी पाऊस पडणार तसेच उर्वरित शेतकऱ्यांच्या पेरण्या सुध्दा या पावसात होणार आहे.
भारतीय हवामान विभाग | India Meteorological Department
भारतीय हवामान विभागाच्या मते, राज्यातील मराठवाड्यात कोकण भागात तसेच विदर्भात पुढील सलग पाच दिवस तूरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. मराठवाड्यात आणि विदर्भात तसेच रत्नागिरी आणि रायगड या भागात १५ जुलै पर्यंत तूरळक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस होऊ शकतो असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
Wrong prediction.