IMD Alert Update : जुलै महिन्यातील पहिल्या आठवड्यात अनेक राज्यात चांगल्या प्रकारे मान्सूनचे आगमन झाले आहे. मात्र मागील दोन दिवसापासून देशात बहूतांश ठिकाणी पावसाने कहर केला आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड तसेच हिमाचल प्रदेश आणि कश्मीर मध्ये गेल्या दोन दिवसात अतिवृष्टी सारखा पाऊस झाल्यामुळे तेथील सामान्य लोकांचे जनजवीन विस्कळीत झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण भारतात सकाळपासून सतत पावसाची धार पाहयला मिळत आहे.
IMD Alert Update | India Meteorological Department
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड मध्ये पुढील 24 तासात अतिवृष्टी सारखा पाऊस पुन्हा एकदा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश मध्ये या राज्यात विजांच्या कडकडाटसह अति मुसळधार पाऊस होणार आहे.
केरळ तामिळनाडू, तेलंगणा, या राज्यात सुध्दा पुढील काही तासात मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. तसेच महाराष्ट्रात सुध्दा पुढील २४ तासात मराठवाडा, विदर्भ आणि कोकण भागात तूरळक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस होण्याची असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.