India Meteorological Department : IMD च्या हवामान अंदाजनुसार, राज्यात पुढील दोन दिवस चांगल्याप्रकारे पाऊस पडणार आहे. मागील काही दिवसापासून कधी उन तर कधी पाऊस, अश्या प्रकारे खेळ सुरु असल्यामुळे राज्यात पुरेसा पडला नाही. अनेक ठिकाणी पावसाळ्या सारख पाऊस पडत नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खुळबंल्या आहेत.
याच दरम्यान भारतीय हवामान खात्याने ( India Meteorological Department ) पुढील २४ तासाचा हवामान अंदाज जारी केला आहे. प्रादेशिक हवामान खात्यानुसार राज्यातील कोकण भागात सलग ५ दिवस भाग बदलत जोरदार पाऊस पडणार आहे. तसेच विदर्भात पुढील दोन दिवस तूरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडणार आहे. भारतीय हवामान खात्यानुसार देशातील मध्य भागात मध्यम ते अति मुसळधार पाऊस पडणार आहे. महाराष्ट्रातील तूरळक ठिकाणी आज मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.