Monsoon Forecast 2023 : जून महिन्यातील शेवटच्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन झाले. मात्र काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही भागात रिमझिम पाऊस पडला आहे. तसेच जुलै महिन्यात सुध्दा मान्सूनने चांगल्याप्रकारे आगमन केल्यानंतर अनेक भागात जोरदार पाऊस पडला आहे.
जुलै महिन्यातील दुसरा आठवडा संपत आला तरीही महाराष्ट्रातील काही भागात मान्सूनचे आगमन झाले नाही. आज महाराष्ट्रातील बहूतांश भागात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे उघडीप पाहयला मिळत आहे. आज ( 14 जुलै ) कोकण भागात अति मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार, विदर्भात आणि मध्य महाराष्ट्रात अनुकूल वातावरण असल्यामुळे अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
आज पाऊस पडेल का ? | Monsoon Forecast 2023
अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, धाराशिव, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, ठाणे, पालघर, पुणे, मुंबई, रायगड, नागपूर या जिल्ह्यात तूरळक ठिकाणी अति मुसळधार पाऊस होणार तसेच उर्वरित भागात आज हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल.
१५ जुलै पर्यंत महाराष्ट्रातील बहूंताश भागात ढगाळ वातावरण असणार तसेच उर्वरित भागात पावसाचा जोर हा ओसरणार आहे. १६ जुलै पासून राज्यात २२ जुलै पर्यंत बहुंताश भागात जोरदार पाऊस पडणार आहे.