Weather Now : जून महिना संपला, जुलै महिन्यातील दुसरा आठवडा संपत आला तरीही राज्यातील अनेक पावसाचे आगमन झाले नाही. यामुळे बहूतांश भागात शेतकऱ्यांच्या खुंळबल्या होत्या परंतू आयएमडीने ( IMD ) ने शेतकऱ्यांना दिलासा देणारा हवामान अंदाज जारी केला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस होणार असल्याची माहिती दिली आहे.
लाईव्ह हवामान अंदाज | Weather Now
हवामान अभ्यासक कृष्णानंद होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार कोकण भाग तसेच मराठवाड्यात आणि विदर्भात १६ जुलै पर्यंत पाऊस पडेल. तसेच खान्देश मधील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात आज पासून २७ जुलै पर्यंत चांगल्या प्रकारे पाऊस पडेल. राज्यात पावसाने उघडीप घेतली होती परंतू अनेक ठिकाणी पावसासाठी अनुकूल वातावरण झाल्यामुळे तूरळक ठिकाणी मध्यम ते हलका पाऊस पडत राहणार आहे. तसेच कोकण भागसह उर्वरित राज्यात हवामान खात्यानुसार पुढील चार दिवस अनेक ठिकाणी चांगल होईल.