Weather Now : राज्यातील वातावरणात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्यामुळे १६ जुलै रोजी विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकण, मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात १५ जुलै रोजी तूरळक ठिकाणी चांगला पाऊस पडला आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मराठवाडा उत्तर महाराष्ट्र तसेच उर्वरित विदर्भात आज विजासह होऊ शकतो. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम भागात आणि दक्षिणकडे कमी दाबाचा पट्टा ( low pressure area ) आहे. तसेच पूर्व भागात सुध्दा साधारण स्थितीत कमी दाबाचा पट्टा आहे. पश्चिम केरळ पासून दक्षिण महाराष्ट्र पर्यंत किनाऱ्याच्या समांतर कमी दाबाचा पट्टा हा कायम आहे.
आज पाऊस पडेल का ?
आज १६ जुलै रोजी अनेक भागात मॉन्सून सक्रीय होऊन जोरदार पाऊस पडू शकतो. तसेच कोकणात सुध्दा हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात ढगाळ वातावरण दिसणार तसेच रिमझिम पाऊस पडू शकतो. दक्षिण कोकण आज सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, नागपूर मध्ये या वीजसह मुसळधार पाऊस पडू शकतो. तसेच उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात भाग बदलत मेघर्गजनासह पाऊस होऊ शकतो. त्यामुळे हवामान खात्याने आज १६ जुलै रोजी येलो अर्लट जारी केला आहे.
अति मुसळधार पावसाचा इशारा
रायगड, नागपूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर
भाग बदलत जोरदार पावसाचा इशारा
जळगाव, गडचिरोली, चंद्रपूर, नगर, छत्रपती संभाजीनगर, गोंदिया, जालना, बीड, लातूर, धाराशिव, भंडारा, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नांदेड, हिंगोली, अकोला, परभणी, बुलडाणा, अमरावती