Panjab Dakh : पंजाब डख यांनी पुन्हा १५ जुलै रोजी शेतकऱ्यांनसाठी नवीन हवामान अंदाज जारी केला आहे. पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजाप्रमाणे १० जुलै पासून १५ जुलै पर्यंत महाराष्ट्रातील अनेक भागात विखुरलेला पाऊस झाला आहे. १८ जुलै पर्यंत भाग बदलत पावसाचा अंदाज पंजाब डख यांनी अंदाज दिला आहे.
पंजाब डख हवामान अंदाज | Panjab Dakh Havaman Andaj | Panjab Dakh Live
पंजाब डख यांनी दिलेल्या अंदाजनुसार, १७ जुलै पर्यंत राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते विखुरलेला पाऊस होत राहिल. परंतू पश्चिम महाराष्ट्रात १८ जुलै ते २१ जुलै पर्यंत पावसाचे प्रमाण कमी राहणार तसेच अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस पडू शकतो. विदर्भात, मराठवाड्यात आणि उत्तर महाराष्ट्रात १८ जुलै पासून पुन्हा जोरदार पावसाचे आगमन होत आहे.
१८ जुलै ते २१ जुलै पर्यंत उत्तर महाराष्ट्रात, मराठवाड्यात, पूर्व विदर्भात तसेच पश्चिम विदर्भात अति मुसळधार पाऊस पडणार आहे. याच दरम्यान पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण हे कमी असल्यामुळे त्या भागात तूरळक ठिकाणी रिमझिम पाऊस होत राहिल. महाराष्ट्रात पुन्हा एकदा २३ जुलै नंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार आहे.