Minister Of Agriculture : महाराष्ट्राचे कृषी मंत्री ( Minister Of Agriculture ) धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांनसाठी शनिवारी १५ जुलै रोजी मोठा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांना शेत तळे व सिंचन पाहिजे, अशा शेतकऱ्यांना शेत तळे मिळणार आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी राज्यात पावसाची कमतरता मोठ्या प्रमाणात असल्यामुळे शेतकऱ्यांन समोर मोठे संकट आले आहे.
शेतकऱ्यांना शेततळे आणि सिंचन हे लॉटरी सिस्टीम द्वारे मंजूर होत. परंतू आता झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कृषी मंत्रि धनंजय मुंढे यांनी असा निर्णय घेतला की, राज्यातील ज्या शेतकऱ्यांना शेत तळे पाहिजे अशा शेतकऱ्यांना शेत तळे मंजूर करुन दिले करुन दिले जाणार आहे. योगायोग असा होता की, त्याच दिवस शनिवारी १५ जुलै रोजी कृषी मंत्री यांचा वाढदिवस होता परंतू सुट्टी न घेता, वाढदिवस साजरा न करता, मंत्रिमंडाळाची बैठक घेऊन शेतकऱ्यांनसाठी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
सध्याच्या परिस्थितीत राज्यात पावसाची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांनवर दुबार परेणीचे संकट उभे राहिले आहे. याचा आढाव कृषी मंत्री ( Minister Of Agriculture ) यांनी घेतला, त्यांनतर मागेल त्याला शेततळे हि योजना राज्यभरात राबवण्यात येईल. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात याचा फायदा होणार आहे. अशी मोठी घोषणा कृषी मंत्री धनंजय मुंडे केली आहे.