Maharashtra Rain Update 2023 : हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार पुढील 3 ते 4 तासात अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी सारखा पाऊस पडू शकतो. गेल्या काही दिवसापासून राज्यातील अनेक भागात पावसासाठी पोषक वातावरण तयार होत झाल्यामुळे आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहयला मिळाले आहे. मुंबई आणि ठाणे या शहरात आज रात्री पासून अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडून शकतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोकण भागात अनेक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस होऊ शकतो.
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रायगड जिल्ह्यात पुढील 3 ते 4 चार तासात वीजासह, जोरदार वाऱ्यासह अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आहे. याच बरोबर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई, ठाणे, पालघर, पुणे या भागात सुध्दा पुढील काही पावसाची सुरुवात होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
कोकण भागात तसेच मध्य महाराष्ट्रात पुढील तीन ते चार दिवस अनेक ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस पडू शकतो. तसेच विदर्भात पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परंतू उर्वरित भागात तसेच मराठवाड्यातील काही भागात मेघर्गजनासह अति मुसळधार पाऊस होऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.