Imd Weather : आयएमडीने ( IMD ) दिलेल्या हवामान अंदाजनुसार राज्यातील काही भागात सलग चार दिवस अति मुसळधार पाऊस पडू शकतो.
महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात आज १८ जूलै रोजी तूफान पाऊस पडणार आहे. यावर्षी मान्सूनने उशीरा आगमन केल्यामुळे महाराष्ट्र मधील धरणातील जलसाठी कमी राहिला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत अनेक भागात पावसाची कमतरता असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. महाराष्ट्रातील असे काही गाव आहेत त्याठिकाणी अजूनहि पाऊस पडला नाही किंवा पुरेसा पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या सुध्दा खुंळबल्या आहेत. ठाण्यासह मुंबई मध्ये आज तूफान पाऊस पडणार आहे.
भारतीय हवामान विभागाने ( India Meteorological Department ) तब्बल चार दिवसाचा हवामान अंदाज जारी केला आहे. हवामान विभागाच्या मते, राज्यातील कोकण भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तूफान पाऊस पडणार आहे. या संदर्भात ठाणे, रायगड, पालघर, मुंबई, रत्नागिरी या भागात आज जोरदार पावसाची हजेरी असणार तसेच पुढील चार दिवस भागात पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. धुळे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यात सुध्दा भाग बदलत मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात २१ जुलै पर्यंत अति मुसाळधार पावसाचा इशारा तसेच धुळे मध्ये २० जुलै पर्यंत पावसाचा इशारा हवामान खात्याने अंदाज दिला आहे.