IMD : राज्यात आज महत्वाच्या काही भागात सकाळपासून रिमझिम पाऊस पडत आहे. तसेच काल पासून अनेक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे जनजीवन हे विस्कळीत होत आहे. हवामान खात्याने मुंबईसह ठाण्याला अर्लटचा इशारा जारी केला आहे.
IMD | 5 ठिकाणी रेड अर्लट जारी
मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी या पाच जिल्ह्यात मागील २४ तासात अति मुसळधार पाऊस झालेला आहे. तसेच पुढील काही तासात या पाच ठिकाणी पुन्हा एकदा पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग या जिल्ह्यात तूरळक ठिकाणी तीव्र पाऊस होऊ शकतो तसेच उर्वरित भागात आज विविध ठिकाणी मध्यम प्रकारचा पावसाची शक्यता आहे.
पुढील २ ते ३ तासात रायगड आणि कोल्हापूर मध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, पालघर मध्ये पाऊस पडणार असल्यामुळे अर्लट राहण्याची सूचना सुध्दा दिल्या आहेत. आयएमडीने दिलेल्या अंदाजानुसार, आज राज्यात विविध ठिकाणी अति मुसळधार पाऊस होईल तसेच उर्वरित भागात सुध्दा मध्यम ते हलक्या प्रकारचा पाऊस होत राहणार आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे, सातार या ठिकाणी आज अनेक ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडणार तसेच रेड अर्लट सुध्दा जारी केला आहे. तसेच पुढील काही तासात कोकण भागात जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे.