Weather Today News : कोल्हापूर, सातारा, जळगाव, पुणे या जिल्ह्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम असणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील धुळे, नंदुरबार, सोलापूर, नाशिक, नगर मध्ये तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर उर्वरित भागात रिमझिम पाऊस पडत आहे. आज दिवसभरात कमी अधिक पाऊस होत राहिला आणि उर्वरित भागात सुध्दा अधुनमधून उन पडत राहिले.
मागील १२ तासात नांदेड, परभणी, हिंगोली या तीन जिल्ह्यात बहूतांश ठिकाणी आज मुसळधार पाऊस झाला आहे. मागील १२ तासात छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना तसेच धाराशीव मध्ये तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. परंतू या चार जिल्ह्यात आज पावसाचा जोर ओसरला आहे.
मागील २४ तासात नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली या चार जिल्ह्यात बहूतांश भागात अति मुसळधार पाऊस झाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार मराठवाड्यात, विदर्भात आणि कोकण भागात आज रात्री बहूतांश भागात जोरदार पाऊस होणार आहे.
आज रात्री पावसाचा जोर वाढणार | Weather Today News
तूरळक ठिकाणी पावसाचा इशारा
पश्चिम विदर्भात : अमरावती, वाशीम, अकोला, बुलढाणा, वर्धा, यवमाळ
मराठवाडा : जालना, लातूर, बीड, धाराशीव
मध्य महाराष्ट्र : कोल्हापूर, सातारा, पुणे
बहूतांश भागात अति मुसळधार पावसाचा इशारा
पूर्व विदर्भात : गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली,
मराठवाडा : नांदेड, हिंगोली, परभरणी
मध्य महाराष्ट्र : सांगली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, धुळे, सोलापूर, नंदूरबार, नगर