India Meteorological Department : आज रात्री 5 तासात 8 ठिकाणी तूफान पाऊस पडणार

India Meteorological Department : आज रात्री 5 तासात 8 ठिकाणी तूफान पाऊस पडणार
India Meteorological Department : आज रात्री 5 तासात 8 ठिकाणी तूफान पाऊस पडणार

 

IMD : भारतीय हवामान विभागाने ( india meteorological department ) दिलेल्या अंदाजनुसार, गोवा, कोकण भाग, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज रात्री तूफान पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या तीन जिल्ह्यांना पुढील पाच दिवसासाठी रेड अलर्ट जारी केला आहे.

सातारा आणि जळगाव मध्ये पुढील काही तासात वाऱ्यासह मेघगर्जना / विजांच्या कडकडाटसह मुसळधार पाऊस होणार आहे. पुढील काही सर्वाधिक पावसाचा जोर पूर्व विदर्भात, पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकण भागात असणार आहे. तसेच मराठवाड्यातील काही भागात आज रात्री हलाका ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

आज दिवस भरात, जळगाव, धुळे, सांगली, परभणी, हिंगोली, अकोला, सोलापूर, जालना या जिल्ह्यात बहूतांश भागात हलका पाऊस पडला आहे परंतू उर्वरित भागात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस सुध्दा पडलेला आहे. तसेच नागपूर, नांदेड, सिंधुदुर्ग, पुणे या भागात आज दिवसभरात अनेक ठिकाणी पावसाचा जोर अधिक पाहयाला मिळाला आहे.

India Meteorological Department | आज रात्री मुसळधार पाऊस पडणार

आयएमडीने दिलेल्या अंदाजनुसार, आज रात्री पुढील ५ तासात रायगड, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, पुणे या जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचा जोर असणार आहे. तसेच आज रात्री मुंबई, ठाणे आणि पालघर या भागात आयएमडीने पावसाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार २५ जुलै पर्यंत राज्यात पावसाचा जोर कायम असणार आहे. तसेच २५ जुलै नंतर दीस आड १ ऑगस्ट पर्यंत विविधि भागात जोरदार पाऊस होत राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायगड, रत्नागिरी, महाबळेश्वर, पुणे लोणावळा तसेच घाटमाथ्यावर आज रात्री तीव्र शक्यता असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी तसेच जनजीवन हे विस्कळीत होण्याची शक्यता आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Weather Today News : 17 जिल्ह्यात आज रात्री पावसाचा जोर वाढणार
Weather Today News : 17 जिल्ह्यात आज रात्री पावसाचा जोर वाढणार

Leave a Comment