PM Kisan : पीएम किसान योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना १३ हप्ता मिळाला आहे. परंतू ज्या शेतकऱ्यांनी ईकेवायसी पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात १३ वा व १४ वा हप्ता जमा होणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, २७ जुलै रोजी रोजी राजस्थान मधील सीखर या कार्यक्रमाच्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेअंतर्गत १४ वा हप्ता जमा करणार आहेत.
पीएम किसान योजनेअंतर्गत दोन हेक्टर पेक्षा कमी शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकाच वेळी साडे आठ कोटीहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात १४ वा हप्ता जमा होऊ शकतो.
खाते असे चेक करा
प्रथम pmkisan.gov. in या सरकारी अधिकृत वेबसाइटवर जाऊन होम पेज वरती फार्मर्स कॉर्नर या पर्यायला निवडल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला आधार नंबर किंवा फोन नंबर|खाते क्रमांक टाकावे लागणार, त्यानंतर तुम्हाला तुमच्या खात्या बदलत संपूर्ण माहिती मिळेल.
पीएम किसान योजनेसाठी अर्ज | PM Kisan
PM Kisan सरकारी अधिकृत वेबसाइटवर जावे, प्रथम पेजवर आल्यावरती तुम्हाला न्यू फार्मर्स रजीस्ट्रेशन या पर्यायाला निवडावे. त्यानंतर आधार नंबर टाकावे तसेच कॅप्चा पूर्ण करावा. त्यानंतर तुमच्या बदल संपूर्ण माहिती भरावून सबमिट करावे.
आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.