India Meteorological Department : महाराष्ट्रातील बहूतांश भागात पावसाची तीव्र गती होत आहे. कोकणसह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अति मुसळधार पाऊस पडू शकतो. गेल्या काही दिवसापासून मराठवाड्यात अनेक ठिकाणी उघडीप होती परंतू पुन्हा एकदा मराठवाड्यात पावसाची सुरुवात झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, मराठवाड्यात अनेक ठिकाणी आज मेघगर्जनासह अतिवृष्टी सारखा पाऊस पडू शकतो.
भारतीय हवामान विभाग | India Meteorological Department
मागील ५ ते ६ दिवसात महाराष्ट्रातील सर्वच भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. कोकण भागातील अनेक जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे सामन्य लोकांचे जनजीवन हे विस्कळीत झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भात पावसाचा जोर वाढत जाणार असल्यामुळे अतिवृष्टी सुध्दा होण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागासाठी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
मराठवाड्यात तूरळक ठिकाणी पावसाने लावली आहे. तसेच कोकण आणि मध्य महाराष्ट्र या भागात अति मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भात तूरळक ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस पडला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील मध्य महाराष्ट्रात, कोकणात, विदर्भात पुढील पाच दिवसात अतिवृष्टीचा पाऊस पडणार. मराठवाड्यात, कोकणात आणि विदर्भात जोरदार वाऱ्यासह, वीजासह अति मुसळधार पाऊस पडणार आहे.