PM Kisan Scheme : महाराष्ट्रात 85 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी पर्यंत अनुदान मिळणार

PM Kisan Scheme : महाराष्ट्रात 85 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी पर्यंत अनुदान मिळणार
PM Kisan Scheme : महाराष्ट्रात 85 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी पर्यंत अनुदान मिळणार

 

PM Kisan Scheme : पीएम किसान योजनेअंतर्गत निधीचे काम महसूल खात्याकडून कृषी विभागाकडे देण्यात आले आहे. कृषी विभागाकडे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधीचे काम हाती आल्यानंतर पहिल्याच टप्यात ४ लाख ५० हजार नवीन शेतकऱ्यांचे नावे सामील करण्यात आले आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत निधी वाटपाचे काम सर्वात आधी महसूल विभागाकडे होते परंतू वारंवार महसूल विभागाने कामावरती बहिष्कार करत असल्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहवे लागत आहे. शेतकऱ्यांना अनुदान वाटपाचे काम हे कृषी विभागाचे असल्यामुळे महसूल विभाग अनुदान वाटपाचे काम करणार नाही, अशी स्पष्ट भूमिका केली आहे.

महसूल विभाग आणि कृषी विभागाचा वाद मुख्य सचिवापर्यंत गेल्यानंतर हा वाद अखेर मिटवण्यात आला आहे. कृषी विभागाने नवीन कार्यपध्दतीनुसार तालुका अधिकाऱ्यासोबत केंद्र सरकारच्य‍ा अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध देण्यात आली आहे.

शासनाच्या संकेतस्थळावरून शेतकरी स्वता नोंदणी करू शकतात. तसेच शेतकऱ्यांना ईकेवायसी करणे अनिवार्य आहे. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अभियान चालवण्यानेमुळे राज्यात ४ लाख ५६ हजार शेतकऱ्यांनी ई केवायसी पूर्ण केली आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत ४ लाख ५६ हजार शेतकऱ्यांची वाढ झाली आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत ( PM Kisan Scheme ) ८१ लाख शेतकऱ्यांना १६५० कोटी रुपये पर्यंत तेराव्या हप्तात वाटण्यात आले होते. कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कठिण परि‌श्रम करुन साडे चार लाख शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत आणले आहे. त्यामुळे यावर्षी १४ वा हप्तात ८५ लाख ५५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात १७०० कोटी पर्यंत अनुदान जमा करण्यात येणार आहे.

सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, २७ जुलै पासून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

आपला बळीराजा : Whatsapp Group वर सामील होऊ शकतात.

PM Kisan : 27 जुलै शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार
PM Kisan : 27 जुलै शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपये जमा होणार

Leave a Comment