India Meteorological Department : महाराष्ट्रातील अनेक भागात आज पावसाचा जोर हा कमी झालेला आहे. राज्यातील अनेक भागात तूरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. आयएमडीने दिलेल्या महितीनुसार राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा जोर कमी होणार आहे.
मध्य महाराष्ट्रात, विदर्भ, कोकण, मराठवाड्यात आज या चारही भागात पावसाचा जोर कमी झालेला आहे. परंतू कोकणात आणि विदर्भात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यातील तूरळक ठिकाणी आज मुसळधार पाऊस झालेला आहे. आयएमडीने सातारा, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यासाठी आज रात्री मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार, रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच विदर्भात बहूतांश ठिकाणी आज रात्री मुसळधार पाऊस पडणार आहे.
आज रात्री पाऊस पडणार | India Meteorological Department
पुढील काही तासात पुढील जिल्ह्यात रायगड, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच विदर्भात बहूतांश ठिकाणी पावसाची सुरुवात होणार आहे.
मध्य महाराष्ट्र : सातारा, पुणे, कोल्हापूर
मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, हिंगोली, जालना, परभणी
खानदेश : जळगाव
विदर्भ : अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर, नागपूर पावसाचा पावसाचा इशारा