Maharashtra Weather Forecast Today : पुढील 2 तासात 10 भागात अतिवृष्टीचा पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : पुढील 2 तासात 10 भागात अतिवृष्टीचा पाऊस
Maharashtra Weather Forecast Today : पुढील 2 तासात 10 भागात अतिवृष्टीचा पाऊस

Maharashtra Weather Forecast Today : महाराष्ट्रात जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यातील उर्वरित दिवसात सुध्दा अतिवृष्टीचा पाऊस पडू शकतो. मागील काही दिवसापासून राज्यातील काही भागात ढगफूटी होत असल्यामुळे जनजीवन हे विस्कळीत होत आहे.

Maharashtra Weather Forecast Today

२४ जुलै पासून २६ जुलै पर्यंत बहूतांश भागात पावसाने उघडीप घेतली होती. परंतू पुन्हा एकदा भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आयएमडीच्या मते, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रासह इतर राज्यात सुध्दा अतिवृष्टीचा फटका बसणार आहे.

गोवा, कोकण, मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोल्हापूर, या भागात पुढील दोन ते तीन तासात अतिवृष्टीचा पाऊस पडणार आहे. तसेच आंध्र, तेलंगणा, उत्तर केरळ, कर्नाटक, दक्षिण ओडिश मध्ये आज रात्री अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असणार तसेच बहूतांश भागात अती तीव्र पाऊस पडणार आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात २८ जुलै पासून विविध पावसाचा जोर अधिक वाढणार आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा तसेच घाट परिसरात आज अति मुसळधार पाऊस ( रेड अर्लट ) पडणार आहे. तसेच हवामान खात्याने पालघर आणि मुंबईसाठी मुसळ धार पाऊस ( ऑरेंज अर्लट ) पडू शकतो.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

PM Kisan Scheme : महाराष्ट्रात 85 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी पर्यंत अनुदान मिळणार
PM Kisan Scheme : महाराष्ट्रात 85 लाख शेतकऱ्यांना 1700 कोटी पर्यंत अनुदान मिळणार

Leave a Comment