Maharashtra Havaman Andaj : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा तयार | महाराष्ट्रात 5 दिवस पावसाचा इशारा

Maharashtra Havaman Andaj : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा तयार | महाराष्ट्रात 5 दिवस पावसाचा इशारा
Maharashtra Havaman Andaj : बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा तयार | महाराष्ट्रात 5 दिवस पावसाचा इशारा

Maharashtra Havaman Andaj : मागील दोन ते तीन दिवसापासून राज्यातील मुंबई आणि ठाण्यात मुसळधार पाऊस होत आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा मुंबई आणि ठाण्यात अति मुसळधार पाऊस होणार असल्यामुळे जनजवीन हे विस्कळीत होण्याची शक्यता दाट आहे.

Maharashtra Havaman Andaj

महाराष्ट्रातील कोकण भाग, पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. आज सकाळ पासून विदर्भात आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे तसेच कोकण भागात अनेक पावसाच्या सरी बरसत आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला असल्यामुळे महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर वाढणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा वायव्य दिशेने सरकणार असल्यामुळे राज्यात पुढील पाच ते सहा दिवस पाऊस पडत राहणार आहे.

भारतीय हवामान विभागाने आज मुंबई साठी रेड अर्लट जारी केला आहे. रायगड, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी या पाच जिल्ह्यांनसाठी ऑरेंज अर्लट जारी केला आहे. कोकण भागात आज २८ जुलै रोजी अति मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे.

आपला बळीराजा : WhatsApp Group वर सामील होऊ शकतात.

Maharashtra Rain : 17 जिल्ह्यांत आज | 28 July | पावसाचा इशारा
Maharashtra Rain : 17 जिल्ह्यांत आज | 28 July | पावसाचा इशारा

Leave a Comment