Maharashtra Weather Update Today : हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील ४ तासात अनेक जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडणार आहे. मिळालेल्या अपडेट्सनुसार, मुंबई, पुणे, कोल्हापूर या जिल्ह्यातील परिसरात पाऊस बरसत आहे.
राज्यातील अनेक शहरात पावसाचा जोर वाढत असल्यामुळे हवामान खात्याने रेड अर्लट जारी केला आहे. मुंबई, ठाणे, रायगड या परिसरात पुढील काही तासात पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील काही भागात आज पुढील तीन ते चार तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच अनेक जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
पुढील 4 तासात धोक्याचा पाऊस पडणार | Maharashtra Weather Update Today
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, कोल्हापूर, सातारा, हिंगोली, परभणी, यवतमाळ या जिल्ह्यातील परिसरात वीजाच्या कडकडाटसह येत्या ४ तासात पाऊस पडणार आहे. हवामान खात्यानुसार ठाणे, मुंबई, पालघर मध्ये पुढील २४ तासात पावसाचा जोर वाढणार आहे.
हवामान विभागाने आज मुंबई, रायगड, पुणे, रत्नागिरी, चंद्रपूर, सातारा, गडचिरोली साठी रेड अर्लट जारी केला आहे. IMD ने दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ, अमरावती, भंडारा, लातूर, नांदेड, हिंगोली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, गोंदिया, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट जारी केला आहे.
तसेच धुळे, जळगाव, अहमदनगर, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद, अकोला, बुलढाणा, नाशिक, नंदुरबार या जिल्ह्यांत तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे. तसेच या जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अर्लट जारी केला आहे.