Havaman Andaj Today Maharashtra : india meteorological department ने पुढील पाच दिवसासाठी हवामान अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, राज्यातील तूरळक भागात पुढील 3 दिवस पाऊस होत राहणार आहे.
महाराष्ट्रातील बहूतांश भागात रविवारी 30 जुलै रोजी पावसाने उघडीप घेतली होती. तसेच जाणंकरांच्या मते आजही बहूतांश भागात हवामान कोरडे राहणार आहे. मुंबई मध्ये रविवारी हवामान कोरडे होते. तसेच उर्वरित महाराष्ट्रातील काही भागात काल मंद प्रकाश आणि ढगाळ वातावरण पाहयला मिळाले आहे.
हवामान खात्यानुसार राज्यात आजही तूरळक भागात पावसासाठी पोषक वातावरण आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, 3 ऑगस्ट पर्यंत रत्नागिरी, रायगड मध्ये पावसासाठी पोषक वातावरण राहणार परंतू हा पाऊस भाग बदलत तूरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे. तसेच आज सोमवारी आणि मंगळवारी मुंबई मध्ये हलका प्रकारचा पाऊस पडू शकतो. ऑगस्ट महिन्यातील पहिल्या आठवड्याची सुरुवात हलक्या पावसाने सुरु होणार आहे.
पुण्यासह विदर्भांत आज ३१ जुलै रोजी तूरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकतो. कोकण भागातील अनेक जिल्ह्यात तूरळक ठिकाणी २ ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार आहे. सध्या महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतलेली आहे.