Namo Scheme : राज्यातील गरीब शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थितीत सुधरावी यासाठी राज्य सरकारने विविध योजना राबवल्या आहेत. ज्या प्रकारे पीएम किसान योजनेअंतर्गत वर्षाकाठी ६ हजार मिळतात त्याच प्रकारे नमो शेतकरी योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना ६ हजार रुपये मिळणार आहे.
अमरावती मध्ये तब्बल २ लाख ५० हजार शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेअंतर्गत पहिला हप्ता मिळणार आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत अडीच लाख शेतकऱ्यांना तीन टप्यात हप्ता मिळणार आहे. परंतू पहिल्याच टप्यात अमरावती मधील ६० हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना हप्ता उशीरा मिळण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी कुटूंबातील प्रमुख व्यक्तीला प्रति महिना ५०० रुपये सुरु आहे परंतू प्रत्येकी चार महिन्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार जमा करण्यात येत आहे. त्याच पाठोपाठ नमो शेतकरी योजनेअंतर्गत सुध्दा प्रत्येकी चार महिन्यानंतर २ हजार रुपये मिळणार आहे.
शेतकऱ्यांना महत्वाची सूचना : ई केवायसी आणि बँक खात्याशी आधार लिंक करणे अनिवार्य आहे.