Weather Update : मागील ३ ते ४ दिवसात राज्यातील बहूतांश भागात पाऊस गायब झाला आहे. परंतू अनेक ठिकाणी मागील आठवड्यात कमी वेळेत अधिक पाऊस झाल्याने तेथे नदी नाले तसेच बंधारे वाहत आहेत.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात पुन्हा एकदा पावसासाठी पोषक वातावरण तयार होणार आहे. कमीन ४ ते ५ दिवसात राज्यात जोरदार पावसाची सुरुवात होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे.
पुढील 7 दिवस राज्यात पावसाचा खंड | 3 August
जुलै महिन्यातील शेवटच्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला परंतू ऑगस्ट महिन्यातील पहिल्याच आठवड्यात पावसाने उघडीप घेतल्याने शेतकऱ्यांन मध्ये चिंता वाढली आहे. पुढील दोन दिवसासाठी राज्यातील कोणत्याच जिल्ह्यांना ऑरेंज अर्लट किंवा रेड अर्लट हवामान खात्याने जारी केला नाही. हवामान खात्यानुसार राज्यात काही तूरळक ठिकाणी सरी बरसतील परंतू हा पाऊस १० मिनिटाचा किंवा २० मिनिटांच्या आतील असणार आहे.
हवामान खात्यानुसार राज्यात ३ ऑगस्ट पासून ९ ऑगस्ट पर्यंत बहूतांश भागात हवामान कोरडे राहणार आहे.