IMD : महाराष्ट्रातील काही भागात गेल्या काही दिवसात ढगफुटी झालेली आहे. हवामान खात्यानुसार पुढील काही दिवस भाग बदलत तूरळक ठिकाणी मध्यम प्रकारचा पाऊस होत राहणार आहे. ऑगस्ट महिन्यातील सुरुवातीच्या दोन आठवड्यात पावसाचे प्रमाण कमी राहील, तसेच १४ ऑगस्ट पासून राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल असा अंदाज हवामान खात्याने जारी केला आहे.
IMD | 5 August
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजनुसार, राज्यात आज ५ ऑगस्ट रोजी राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होणार आहे. गोंदिया जिल्ह्यात बहूतांश ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने त्याठिकाणी नदी नाले दुधडी भरून वाहत आहे. तसेच भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी सुध्दा जोरदार पाऊस पडत असल्याने नागरिकांनी आपला जीव धोक्यात घालू नये अश्या सूचना हवामान खात्याने दिल्या आहेत.
अहमदनगरसह अनेक जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात बहूतांश भागात पुरेशा पाऊस झालेला नाही. आयएमडीने ( IMD ) दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील कोकण भागातील रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा मध्ये येलो अर्लट जारी केला केला आहे.