IMD Weather Forecast : ऑगस्ट महिना लागल्यापासून राज्यातील तूरळक ठिकाणी पाऊस झाला परंतू बहूतांश उर्वरित भागात एकदा हि पाऊस पडला नाही. यामुळे शेतकऱ्यांन मध्ये दिवसांन दिवस चिंता वाढत आहे. तसेच हवामान खात्यानुसार, राज्यात पुढील काही दिवस अनेक भागात पावसाची उघडीप राहणार आहे.
जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस पडला होता. परंतू ऑगस्ट महिना लागल्या पासून राज्यातील कोणताही भागात चांगल्या प्रकारे पाऊस पडला नाही. आयएमडीने दिलेल्या अंदाजनुसार, राज्यातील काही भागात २० ऑगस्ट पर्यंत पावसाची उघडीप राहणार आहे.
गेल्या १० ते १२ दिवसापासून राज्यातील अनेक भागात पाऊस पडला नाही. तसेच पुढील काही दिवस पावसाने हजेरी नाही लावल्यास तर शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीचे संकट उभे राहू शकते.
सरासर विचार केला तर, नगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, सांगली, जालना, जळगाव, अकोला, हिंगोली, सातारा या नऊ जिल्ह्यातील काही भागात अजून हि चांगल्या प्रकारे पावसाने हजेरी लावलेली नाही. तसेच महाराष्ट्रातील बहूतांश भागात पावसाची प्रतिक्षा आहे. भारतीय हवामान खात्यानुसार २० ऑगस्ट पासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार ऑगस्ट महिन्यात पावसाची कमतरात राहणार आहे. परंतू तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात सामान्य प्रकराचा पाऊस सर्वदूर पडणार आहे.