India Meteorological Department : भारतातील अनेक राज्यात, ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर कमी पाहयला मिळाला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या प्रमाणे २४ जुलै रोजी महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला होता तसेच सर्वदूर पाऊस पडला आहे. दुसऱ्यांदा हवामान अंदाज जारी केल्यानुसार, ऑगस्ट महिन्यातील पहिल्याच आठवड्यात बहूतांश भागात पावसाचा जोर कमी झाला आहे.
India Meteorological Department | भारतीय हवामान विभाग
भारतीय हवामान विभागानुसार, चालू आठवड्यात कोकण भागात आणि विदर्भ तूरळक ठिकाणी ढगाळ वातावरण तसेच हलका पाऊस पडू शकतो. १८ ऑगस्ट पासून राज्यात पावसाची सुरुवात होईल तसेच १९ ऑगस्ट पासून तूरळक भागात पावसाचा जोर वाढेल. तसेच मराठवाड्यात आणि विदर्भात १८ ते २४ ऑगस्ट दरम्यान पाऊस होत राहणार आहे.
राज्यात आणखीन काही दिवस पावसाने उघडीप घेतली तर अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील बहूतांश भागात आणि विदर्भातील तूरळक ठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस पडलेला नाही. अजूनहि शेतकरी प्रतिक्षा करत आहेत.