India Meteorological Department : देशातील काही राज्य सोडता उर्वरीत राज्यात पावसाने थैमान घातले आहे. परंतू महाराष्ट्रसह अनेक राज्यात गेल्या १५ दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस पडत नाही यामुळे शेतकऱ्यांनवर दुबार पेरणीची वेळ आहे.
भारतीय हवामान विभाग | India Meteorological Department
मागील वर्षी पावसाने महाराष्ट्रात थैमान घातले होते परंतू यावर्षी दुष्काळ पडतो की काय असे वाटत आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजनुसार, महाराष्ट्रात पुन्हा जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे. २४ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस धो धो पडणार आहे. आज पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहयला मिळत आहे.
आज रात्री पाऊस पडणार का ?
आज पूर्व विदर्भात रात्री पुन्हा एकदा जोरदार पावसाची सुरुवात होणार आहे. तसेच कोकण भागात आज तूरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो. हवामान अभ्यासक यांनी दिलेल्या अंदाजनुसार आज पूर्व विदर्भात आणि कोकण भागात पावसाचा जोर वाढणा परंतू पश्चिम विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात १८ तारखेपासून जोरदार पावसाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. तसेच २० ऑगस्ट पर्यंत मराठवाड्यात सुध्दा मुसळधार पावसाची सुरुवात होणार आहे.
१८ ऑगस्ट पासून ३० ऑगस्ट पर्यंत मध्य महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाचा जोर पाहयला मिळणार आहे. गेल्या १५ दिवसापासून राज्यात पावसाचा थेंब नसल्यामुळे शेतकऱ्यांनवर दुबार परेणीची वेळ येणार होती परंतू पुन्हा एकदा राज्यात मुसळधार पडणार असल्यामुळे पिकांना हा पाऊस जीवनदान ठरवू शकतो. परंतू हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कमी वेळेत अति मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होऊ शकते.